६ दशके सत्तेत असलेल्या काँग्रेसने हे केले नाही !
भारताच्या सीमा बळकट केल्या जात आहेत. वर्ष २०१४ नंतर भारताने सीमेवरील परिसरात पायाभूत सुविधा उभारण्यास आरंभ केला, असे वक्तव्य परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले.
भारताच्या सीमा बळकट केल्या जात आहेत. वर्ष २०१४ नंतर भारताने सीमेवरील परिसरात पायाभूत सुविधा उभारण्यास आरंभ केला, असे वक्तव्य परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले.
येथील महागाव तालुक्यातील पोखरी इजारा येथे चालू असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या पाणीपुरवठा टाकीचे सेट्रिंग कोसळून २ कामगार घायाळ झाले. ग्रामस्थांनी कंत्राटदार आणि अभियंते यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
येथील २२ वर्षीय आंतरराष्ट्रीय जलतरणपटू जयंत दुबळे यांनी सर्वांत कठीण समजल्या जाणार्या इंग्लिश खाडीत दुहेरी पोहण्याचा विक्रम केला आहे. इंग्लंड ते फ्रान्स आणि परत फ्रान्स ते इंग्लंड हे ७० कि.मी.चे अंतर त्यांनी ३१ घंटे २९ मिनिटांत पूर्ण केले.
मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव ८० टक्के क्षमतेने भरलेले आहेत. अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा ७ तलावांमधून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो.
‘महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्ये केल्याची अनेक प्रकरणे असतांना केवळ संभाजी भिडे यांच्या विरोधात जनहित याचिका का ?’ असा प्रश्नही या वेळी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांनी उपस्थित केला.
ओझर येथे घराच्या छतावरून लोखंडी सळईने पेरू तोडतांना उच्च दाबाच्या वीजवाहिनीच्या धक्क्याने मायलेकींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ६ ऑगस्ट या दिवशी घडली.
मागील ३-४ दिवसांपासून बाळे पुलानजीक सोलापूर महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. स्थानिक नागरिकांनी याविषयी महापालिकेला वारंवार कळवूनही याची कोणतीही नोंद पालिकेकडून घेण्यात आलेली नाही.
गोंडगाव येथील ७ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या विरोधात पाचोरा शहरात ७ ऑगस्ट या दिवशी बंद पाळण्यात आला.
शहरातील कचरा उठावाचा प्रश्न गंभीर असून कचरा उठावामध्ये अनियमितता असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात साथीच्या आजारांनी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असतांना प्रशासन तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम करत आहे का ? केंद्र आणि राज्य सरकारकडून कचरा निर्गतीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येत आहे.
आपापसातही भांडणारे अधिवक्ते !