जलजीवन मिशन योजनेच्‍या पाणीपुरवठा टाकीचे ‘सेंट्रिंग’ कोसळून २ कामगार घायाळ !

यवतमाळ – येथील महागाव तालुक्‍यातील पोखरी इजारा येथे चालू असलेल्‍या जलजीवन मिशन योजनेच्‍या पाणीपुरवठा टाकीचे सेट्रिंग कोसळून २ कामगार घायाळ झाले. ग्रामस्‍थांनी कंत्राटदार आणि अभियंते यांच्‍यावर गुन्‍हा नोंदवण्‍याची मागणी करण्‍यात आलेली आहे. येथे पाण्‍याच्‍या टाकीचे काम चालू आहे. टाकीच्‍या स्‍लॅबसाठी ठोकलेले सेंट्रिंग कोसळून भरत वाघे आणि शेख चांद हे तरुण गंभीर घायाळ झाले आहेत. त्‍यांपैकी एकाचा पाय मोडला असून दुसर्‍याला रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले आहे.