आपापसातही भांडणारे अधिवक्ते !
नागपूर – येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या बार रूममध्ये एक नवीन आणि वरिष्ठ अधिवक्ते यांच्यातील वाद आणि हाणामारी समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे.
नवोदित अधिवक्ता ज्येष्ठ अधिवक्त्यांच्या खुर्चीवर बसला होता. ते आल्यावर त्यांनी त्यांना उठण्यास सांगितले. त्या वेळी ‘एवढा अर्ज लिहून उठतो’, असे त्यांनी सांगितल्यावर ज्येष्ठ अधिवक्त्यांनी त्यांना शिवीगाळ केली, तसेच त्यांच्या श्रीमुखातही दिली. त्यानंतर त्यांनी वरिष्ठाच्या डोक्यावर त्यांचीच खुर्ची मारली. यामुळे ज्येष्ठ अधिवक्त्यांना गंभीर दुखापत झाली. याची छायाचित्रे सामाजिक प्रसारमाध्यमांतून प्रसारित झाली आहेत.