नागपूर – येथील २२ वर्षीय आंतरराष्ट्रीय जलतरणपटू जयंत दुबळे यांनी सर्वांत कठीण समजल्या जाणार्या इंग्लिश खाडीत दुहेरी पोहण्याचा विक्रम केला आहे. इंग्लंड ते फ्रान्स आणि परत फ्रान्स ते इंग्लंड हे ७० कि.मी.चे अंतर त्यांनी ३१ घंटे २९ मिनिटांत पूर्ण केले. यामुळे भारताचे नाव आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणातही नोंदवले गेले आहे. येथील पाणी १२ ते १५ अंश डिग्री सेल्सिअस थंड पाणी, तसेच धुके आणि पाण्यातील विविध जलचरही ही आव्हाने त्यांच्यासमोर होती.