खोट्या बलात्काराच्या प्रकरणांत लोकांना अडकवून त्यांना ‘ब्लॅकमेल’ करणार्‍या तरुणींच्या कारस्थानात पोलिसांचा सहभाग 

गोव्यातील पोलिसांचे गुन्हेगारीकरण होत आहे. पोलिसांच्या गुन्ह्यातील सहभागाची एकावर एक प्रकरणे उघड होत आहेत. हे त्वरित रोखणे आवश्यक आहे. हे असेच चालू राहिल्यास राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडून अराजक माजेल !

पुणे येथे गुणपत्रिकेसाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेणार्‍या कर्मचार्‍याचे निलंबन !

शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये होणारा भ्रष्टाचार समाजाची नैतिकता पराकोटीची अधोगतीला गेली आहे, हे दर्शवतो. अशा भ्रष्ट कर्मचार्‍यांना निलंबन नको, तर बडतर्फ करून कठोर शिक्षाही हवी !

कल्याण येथे अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील चाळे करणार्‍या तरुणाला अटक !

अशांना तात्काळ आणि कठोर शिक्षा  झाल्याविना या घटना थांबणार नाहीत !

गडचिरोली येथे कामचुकार कर्मचार्‍यांमुळे कार्यालय केले सील !

‘कामात दिरंगाई करणे, कार्यालयात विलंबाने येणे, निष्काळजीपणा त्यांच्यात होता. १ मास वारंवार सूचना देऊनही त्यांच्या कामात सुधारणा दिसून आली नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

गणेशोत्सव मंडळांना उत्सवासाठी ५ वर्षांची अनुमती मिळणार !

मंडळांनीही योग्य प्रतिसाद द्यावा. वाहतुकीला अडथळा येणार नाही, याची दक्षता घ्यावी. मूर्ती विसर्जन करतांना उत्सवाचे पावित्र्य राखले जाईल, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

संत आणि गुरु यांच्या कार्यातील भेद !

‘संत मायेतील अडचणी सोडवून साधनेची ओळख करून देतात, तर गुरु मोक्षप्राप्तीची वाट दाखवतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

राज्यात फुटबॉल विकासासाठी जर्मनीतील ‘बुंदेसलिगा’सह सामंजस्य करार !

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन अन् जर्मनी येथील ‘बुंदेसलिगा’या सर्वांत मोठ्या व्यावसायिक फुटबॉल लीगमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

कारी (जिल्हा सातारा) येथील प्रतीक्षा मोरे यांचा ‘शिवछत्रपती’ पुरस्काराने गौरव !

पुणे येथे झालेल्या ‘शिवछत्रपती’ पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कारी येथील प्रतीक्षा मोरे यांना मल्लखांब खेळातील कामगिरीविषयी ‘शिवछत्रपती’ क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्री उपस्थित होते.