
पुणे – राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन अन् जर्मनी येथील ‘बुंदेसलिगा’या सर्वांत मोठ्या व्यावसायिक फुटबॉल लीगमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्राच्या वतीने शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल आणि क्रीडा अन् युवक सेवा आयुक्त सुहास दिवसे, तर बुंदेसलिगाचे प्रतिनिधी ज्युलिया फार, पीटर लीबल, कौशिक मौलिक यांच्यात कराराचे आदान-प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राशी झालेल्या करारामुळे राज्यांतर्गत फुटबॉलच्या विकासासाठी लीगकडील कौशल्य आणि संसाधने यांचा लाभ होणार आहे.
या कराराविषयी समाधान व्यक्त करतांना राज्यपाल बैस म्हणाले की, राज्यातील अनेक जिल्ह्यांत फुटबॉल लोकप्रिय आहे. राज्यात फुटबॉलसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे अधिक प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने या कराराद्वारे राज्याने घेतलेल्या पुढाकाराचे राज्यपालांनी स्वागत केले.
बुंदेसलिगा ही जर्मनीची प्रमुख व्यावसायिक फुटबॉल लीग आहे. रोमांचक फुटबॉल स्पर्धांचा अनुभव आणि समृद्ध इतिहासासाठी लीग प्रसिद्ध आहे. ही युरोपमधील अग्रणी फुटबॉल लीगपैकी असून फुटबॉलमधील सर्वोत्तम खेळाडू आणि संघ लीगशी संबंधित आहेत. जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणारे कुशल खेळाडू घडवण्याचे कार्य ही लीग करते. या भागीदारीमुळे महाराष्ट्र क्रीडा विकास आणि यशाच्या एका नव्या पर्वाचा साक्षीदार होणार आहे.
पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड ऐतिहासिक पदभ्रमण २०२६ उत्साहात !
मुंबईतील आंदोलनातून फहाद अहमद कह्यात !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या संरक्षणासाठी १५ दिवसांत अधिसूचना काढा !
यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना घोषित !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण भक्तीमय वातावरणात पार पडले !
जंजिरा दुर्गावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ची चेतावणी !