भारतातील प्राचीन नौकाशास्त्र : आर्यावर्ताची विश्वाला देणगी !
धर्म आणि विज्ञान यांच्या परस्परविरोधी संकल्पनेचे मूळ भारतीय संस्कृतीमध्ये कुठेही आढळत नाही. आम्ही तर विज्ञानालाही ज्ञानाच्या दृष्टीने धर्माचा एक अंग मानत होतो. भारतात कोणत्याही विद्यापिठाची पदवी घेतलेली नसतांनासुद्धा ज्ञानप्राप्त ऋषीमुनींनी आत्मसाक्षात्काराद्वारे विज्ञानाचे सिद्धांत प्रकट केले आहेत.