देशी बियाणी लावावीत !

‘आज अधिक उत्पन्न मिळण्यासाठी विविध प्रकारच्या प्रक्रिया करून सिद्ध केलेली ‘हायब्रीड’ बियाणी पेठेत सहज उपलब्ध आहेत; परंतु या बियाण्यांच्या उपयोगाने होणार्‍या लाभांपेक्षा होणारी हानी पुष्कळ गंभीर आहे. देशी बियाण्यांपासून मिळणारा भाजीपाला आरोग्यास लाभदायक आणि चवीलाही अधिक चांगला असतो.

पुणे येथील ‘जलसंपदा’तील उपविभागीय अधिकारी लाच घेतांना सापडले !

पूररेषेच्या आत भूमीचे सपाटीकरण केल्याने कारवाईची भीती दाखवून जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी तुळशीदास आंधळे यांनी ७ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील साडेतीन लाख रुपये स्वीकारतांना आंधळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.

मराठी भाषेशी असलेले भावनिक नाते टिकवणे आवश्यक !

इंग्रजीला उत्तर द्यायचे, तर आपल्या बोलीभाषांना मान द्यायला शिकले पाहिजे. या भाषा भावनांच्या भाषा आहेत. पैशाच्या भाषा नाहीत. त्यांच्याशी असलेले भावनिक नाते टिकवले पाहिजे.

संतांनी मराठी भाषा सुंदर ठेवली ! – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

संत ज्ञानेश्वरांपासून ते शिवकालीन संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, श्रीसमर्थ रामदासस्वामी, श्रीदासोपंत इत्यादी अगदी श्रीगोंदेकर, शेख महम्मदबाबांसह सगळ्या संतांनी आपली ही मराठी भाषा सुंदर ठेवली आणि साजरीगोजरी बनवली.

शालेय शिक्षण मातृभाषेतूनच होणे आवश्यक !

भारतीय परराष्ट्र सेवा या क्षेत्रांत आज १० टक्केही मराठी माणसे नाहीत. हे चित्र पालटायचे, तर माय मराठी मातीची कास धरावी लागेल. शिक्षणपद्धतीत आमूलाग्र पालट करावा लागेल. तळागाळाचा विकास हे मुख्य ध्येय ठरवावे लागेल.

शिवसेना पक्षचिन्ह आणि कायदा-सुव्यवस्था विषयांवरून अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे !

खासदार संजय राऊत यांना ठार मारण्याची सुपारी देण्याचा विषय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पोलीस चौकीत मारहाण आणि त्यात त्याचा मृत्यू, तसेच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आदी प्रश्नांवरून हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.

‘ऑनलाईन’ साधना सत्संगासाठी संहितालेखनाची सेवा ‘गुरुपूजन’ या भावाने करणार्‍या पडेल (जि. सिंधुदुर्ग) येथील सौ. जोत्स्ना रविकांत नारकर !

वर्ष २०२० मध्ये कोरोनामुळे लागू झालेल्या दळणवळण बंदीमुळे साधकांना सेवा करणे शक्य होणार नव्हते. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘ऑनलाईन’ सत्संग चालू झाले. ही सेवा करतांना त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा, त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

आजारपणाच्या काळात साधक वसतीगृहात एकटाच असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सूक्ष्मातून आधार देणे

आजारपणाच्या काळात श्री. विनायक दिलीप मिठारे यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

आधुनिक वैद्या (सौ.) अरुणा सिंह यांना त्यांच्या नूतन वास्तूत राक्षोघ्न याग करतांना आलेल्या अनुभूती

‘२३.११.२०२० या दिवशी आम्ही फोंडा येथील नूतन वास्तू ‘सार्थक आश्रम’ येथे राक्षोघ्न याग आयोजित केला होता. सनातनचे साधक पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी, श्री. अंबरीष वझे आणि श्री. कौशल दामले यांनी यागाचे पौरोहित्य केले.

हिंदूंनो, देश आणि धर्म यांच्या रक्षणाप्रीत्यर्थ सिद्ध व्हा ! – टी. राजासिंह 

येथे २६ फेब्रुवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने आयोजित झालेल्या विराट ‘हिंदु गर्जना मोर्च्या’मध्ये त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. मोर्च्यामध्ये ३० सहस्रांहून अधिक हिंदूंनी उपस्थित राहून लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या बंदी कायद्यांच्या मागणीचा जोर धरला होता.