आधुनिक वैद्या (सौ.) अरुणा सिंह यांना त्यांच्या नूतन वास्तूत राक्षोघ्न याग करतांना आलेल्या अनुभूती

आधुनिक वैद्या (सौ.) अरुणा सिंह

१. पूर्वसिद्धता चालू असतांना आलेल्या अनुभूती

१ अ. राक्षोघ्न यागाच्या दिवशी सकाळपासून आध्यात्मिक त्रास होणे; परंतु यागाची वेळ जवळ येत असतांना चैतन्य आणि उत्साह जाणवणे : ‘२३.११.२०२० या दिवशी आम्ही फोंडा येथील नूतन वास्तू ‘सार्थक आश्रम’ येथे राक्षोघ्न याग आयोजित केला होता. सनातनचे साधक पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी, श्री. अंबरीष वझे आणि श्री. कौशल दामले यांनी यागाचे पौरोहित्य केले. माझा पुत्र श्री. शशांक सिंह याने यजमानपद भूषवले. त्या दिवशी सकाळपासूनच मला आध्यात्मिक त्रास होत होता; मात्र जसजशी यागाची वेळ जवळ येत होती, तसे मला चैतन्य मिळून उत्साह जाणवू लागला.

श्री. शशांक सिंह

१ आ. यागाची सिद्धता होत असतांना वातावरण प्रसन्न झाले आणि आमची मने प्रफुल्लित झाली.

१ इ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, त्यांच्या मागोमाग श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ अन् सनातन संस्थेचे अन्य संत यांचे सार्थक आश्रमात आगमन होत आहे आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी होत आहे’, असे मला जाणवले.

२. यागाच्या वेळी आलेल्या अनुभूती

अ. ‘यागाच्या वेळी ३ पुरोहित मंत्रोच्चार करतांना जणूकाही ‘साक्षात् त्रिदेव तेथे विराजमान झाले आहेत’, असे मला जाणवत होते.

आ. ‘शिव भगवान चंद्रशेखररूपात पौरोहित्य करत आहे आणि साक्षात् महाकाली आहुती स्वीकारत आहे’, असे मला जाणवले.

इ. ‘काळ्या तिळाची आहुती देतांना नकारात्मक ऊर्जा आणि अनिष्ट शक्ती नष्ट होत आहेत’, असे मला जाणवले. समर्पित समिधा नष्ट झालेल्या अनिष्ट शक्तींच्या अस्थींसारख्या दिसत होत्या.

३. यागाचा परिणाम

अ. ‘राक्षोघ्न यागामुळे इमारतीच्या सभोवती संरक्षककवच निर्माण होत आहे आणि याग चालू असतांना ते कवच दृढ होत आहे’, असे मला जाणवले.

आ. शशांकने भावपूर्णरित्या विधी केले. ‘त्याच्या मुखमंडलावरील कांती उजळली’, असे मला जाणवले.

४. आदर्श प्रार्थना

माझी भगवंताला प्रार्थना होत होती, ‘माझ्याकडून होणारी प्रत्येक कृती, मनात येणारा प्रत्येक विचार, बुद्धीद्वारे घेतलेला प्रत्येक निर्णय आणि चित्तावर होणारा प्रत्येक संस्कार परात्पर गुरु डॉक्टरांच्याच इच्छेनुसार होऊ दे.’

५. कृतज्ञता

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेनेच राक्षोघ्न याग निर्विघ्नपणे पार पडला. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– आधुनिक वैद्या (सौ.) अरुणा सिंह, फोंडा, गोवा. (२३.११.२०२०)


  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.