तालिबानने पाकिस्तानवर नियंत्रण मिळवल्यास आश्चर्य वाटू नये ! – तस्लिमा नसरीन

तस्लिमा नसरीन

नवी देहली – पाकिस्तानमध्ये आतंकवाद पसरवण्यासाठी इस्लामिक स्टेटची आवश्यकता नाही, त्यासाठी तालिबानच पुरेसे आहे. तालिबानने पाकिस्तानवर नियंत्रण मिळवल्यास आश्चर्य वाटू नये, असे ट्वीट बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले.

पाकमध्ये सातत्याने तालिबानी आतंकवादी घातपात करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर तस्लिमा नसरीन यांनी हे विधान केले आहे.