काहींना भारत आणि पंतप्रधान मोदी यांचे यश पहावत नाही ! – ब्रिटीश खासदार रामी रेंजर

ब्रिटीश खासदार रामी रेंजर यांनी बीबीसीला फटकारले

माहितीपट मूठभर मोदीविरोधकांच्या विधानांवर आधारित असल्याचा आरोप

डावीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटीश खासदार रामी रेंजर

लंडन – काहींना भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यश पहावत नाही, अशा शब्दांत ब्रिटीश खासदार रामी रेंजर यांनी बीबीसीच्या हिंदुद्वेषी आणि भारतद्वेषी माहितीपटावरून बीबीसीला फटकारले. काही दिवसांपूर्वी बीबीसीने गुजरात दंगलींवर आधारित ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ या नावाचा एक द्वेषपूर्ण माहितीपट बनवला होता.  त्यावर भारतात सडकून टीका झाली होती.

रेंजर पुढे म्हणाले, ‘‘बीबीसीने प्रसारित केलेला माहितीपट हा केवळ अपप्रचार होता. आता भारत पालटत आहे. त्यामुळेच या माहितीपटाविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. बीबीसीने २ महान देशांतील संबंध बिघडवण्याचे काम केले आहे. हा माहितीपट चुकीच्या वेळी आणि चुकीचा संदेश देणारा होता. हा माहितीपट मूठभर मोदीविरोधकांच्या विधानांवर आधारित आहे.’’

यापूर्वी अन्य एक ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनीही बीबीसीच्या या माहितीपटावर सडकून टीका केली होती.