(डूडल म्हणजे गूगलद्वारे एखादी व्यक्ती अथवा दिनाविषयी चित्र स्वरूपात दिलेली माहिती)
सातारा, १६ जानेवारी (वार्ता.) – भारताला वर्ष १९५२ मध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात पैलवान खाशाबा जाधव यांनी पहिले ऑलिंपिक पदक मिळवून दिले. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत गूगलने १५ जानेवारीला डूडलद्वारे विशेष श्रद्धांजली वाहिली.
पैलवान खाशाबा जाधव हे कराड तालुक्यातील गोळेश्वर गावचे सुपुत्र होते. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ या दिवशी झाला. कुटुंबाला कुस्तीचा वारसा असल्यामुळे त्यांनी कुस्ती आणि मल्लविद्या शिकण्यासाठी कोल्हापूर गाठले. पुढे ते ऑलिंपिकपर्यंत पोचले. पैलवान खाशाबा जाधव यांनी ऑलिंपिकमध्ये मिळवलेल्या पदकानंतर ४४ वर्षांनंतर भारताला वैयक्तिक पदक मिळाले.