नागपूर येथे दाट धुक्‍यामुळे ३३ रेल्‍वेगाड्यांना विलंब !

नागपूर – शहरात मोठ्या प्रमाणात दाट धुके पसरल्‍याने त्‍याचा रेल्‍वेसेवेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्‍यामुळे नागपूर येथून धावणार्‍या अनेक रेल्‍वेगाड्या विलंबाने धावत असल्‍याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. धुक्‍याचा ३३ रेल्‍वेगाड्यांच्‍या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. या रेल्‍वेगाड्यांपैकी काही रेल्‍वेगाड्या १ ते २ घंटे, तर काही गाड्या ६ घंटे विलंबाने धावत आहेत. प्रतीक्षालयात जागा अल्‍प पडू लागल्‍याने अनेक प्रवासी रेल्‍वेस्‍थानकाचे विविध फलाट आणि रेल्‍वेस्‍थानकाचा परिसर येथे जागा मिळेल तेथे दाटीवाटीने बसलेले आहेत.