नागपूर – श्रीचिन्मय मिशनच्या वतीने ‘श्रीगीता पठण आभासी (ऑनलाईन) अंतिम स्पर्धा (तिसरा अध्याय)’ डिसेंबर २०२२ मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत सनातनचा बालसाधक कु. आदिनाथ अंकुश देशपांडे (वय ८ वर्षे) याला प्रथम पारितोषिक म्हणून एक ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि स्वामी विवेकानंदांविषयीचे पुस्तक मिळाले. या स्पर्धेत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील ६५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. ६५० स्पर्धकांमधून केवळ ५ स्पर्धकांना ‘बेस्ट स्टार परफॉर्मर’ म्हणून ट्रॉफी मिळाली. पारितोषिक वितरण सोहळा येथे ७ जानेवारी या दिवशी पार पडला. ‘गुरुकृपेनेच हे यश मिळाले’, असे कु. आदिनाथने सांगितले.