हिंदु युवतींनी रणरागिणी होऊन ‘लव्‍ह जिहाद’चा सामना करण्‍यासाठी सिद्ध व्‍हावे ! – सौ. गौरी जोशी, रणरागिणी शाखा

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने गोंदिया जिल्‍ह्यातील कवलेवाडा येथे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती सभे’चे आयोजन

सौ. गौरी जोशी, रणरागिणी शाखा

नागपूर, ११ जानेवारी (वार्ता.) – ज्‍या देशात पुरुषांच्‍या बरोबरीने नव्‍हे, तर प्रसंगी युद्धात नेतृत्‍व घेऊन धर्मांध आक्रमकांना परतवून लावणार्‍या राजमाता जिजाऊ, राणी चेन्‍नम्‍मा यांसारख्‍या शूर, कर्तबगार स्‍त्रिया झाल्‍या, त्‍या देशातील हिंदु तरुणी धर्मांधांच्‍या खोट्या प्रेमाला फसून ‘लव्‍ह जिहाद’ला बळी पडत आहेत. या युवतींना शारीरिक शोषण, छळ, वेश्‍या व्‍यवसाय, क्रूर मृत्‍यू अशा गोष्‍टींना सामोरे जावे लागते. हे थांबवण्‍यासाठी हिंदु युवतींनी शारीरिक आणि मानसिक दृष्‍ट्या कणखर होणे आवश्‍यक आहे, तसेच आध्‍यात्मिक सामर्थ्‍य वाढवण्‍यासाठी नित्‍य साधना करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन सौ. गौरी जोशी यांनी केले. त्‍या गोंदिया जिल्‍ह्यातील कवलेवाडा येथील श्री दुर्गा मंदिराच्‍या सभागृहात हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्‍या ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती सभे’त बोलत होत्‍या.

सभेसाठी विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्‍या समवेत १५० हून अधिक धर्मप्रेमी हिंदू उपस्‍थित होते. हिंदु जनजागृती समितीचा परिचय श्री. नीरज आवदे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन श्री. चौधरी यांनी केले. सर्व समस्‍यांवर हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करणे, हाच परिणामकारक उपाय आहे’, असे मार्गदर्शन समितीचे श्री. अतुल अर्वेन्‍ला यांनी केले.

क्षणचित्र

सभेनंतरच्‍या बैठकीत धर्मशिक्षण मिळण्‍यासाठी २ साप्‍ताहिक धर्मशिक्षणवर्ग चालू करण्‍याचे ठरले.