कराड येथील श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे ज्‍येष्‍ठ धारकरी रवींद्र केशव डोंबे यांचे निधन !

कै. रवींद्र डोंबे

कराड – येथील चौंडेश्‍वरीनगरमधील श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे ज्‍येष्‍ठ धारकरी रवींद्र केशव डोंबे (वय ५१ वर्षे) यांचे बुधवार, ४ जानेवारी या रात्री हृदयविकाराच्‍या तीव्र झटक्‍यामुळे निधन झाले. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. रवींद्र डोंबे यांच्‍या पार्थिवावर ५ जानेवारी या दिवशी अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍यासह विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नातेवाईक, समाजबांधव मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.

रवींद्र डोंबे यांनी कराड शहर आणि तालुक्‍यात श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या कार्यास प्रारंभ केला. गोवारे, तालुका कराड या ठिकाणी मशिदीच्‍या अवैद्य बांधकामाच्‍या विरोधात त्‍यांनी आवाज उठवून अवैद्य बांधकाम हटवण्‍याविषयी कराड येथील तहसीलदार कार्यालयाच्‍या समोर आमरण उपोषण केले होते. देव, देश, धर्म, तसेच गोरक्षणाच्‍या कार्यात, विविध आंदोलनांत त्‍यांचा सहभाग होता. प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ म्‍हणून त्‍यांची ओळख होती.

सनातन परिवार डोंबे कुटुंबियांच्‍या दुःखात सहभागी आहेत.