वणी (यवतमाळ) येथील भंगारचोरांचे सुरक्षारक्षकावर लोखंडी सळईने आक्रमण !

एकावर गुन्‍हा नोंद

प्रतिकात्मक छायाचित्र

वणी (यवतमाळ), ६ जानेवारी (वार्ता.) – येथील परिसरातील बंद असलेल्‍या पिंपळगाव कोळसा खाणीतील भंगार चोरतांना सुरक्षारक्षकांनी आडकाठी आणल्‍याने चोरट्यांनी लोखंडी सळईने सुरक्षारक्षक विशाल खंडारे यांच्‍यावर आक्रमण केले. ४ जानेवारीच्‍या पहाटे खाणीतील लोखंड चोरून नेण्‍याचा प्रयत्न चोरट्यांनी केला; पण नंतर ते पळून गेले. त्‍यांच्‍यातील एक असणारा संजय वाईकर खाली पडून घायाळ झाल्‍याने सुरक्षारक्षकांनी पकडले. त्‍याच्‍यावर गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहे.

संपादकीय भूमिका

कायदा-सुव्‍यवस्‍थेचा धाक नसल्‍याचेच लक्षण !