रामनाथी (गोवा) – सनातन संस्थेच्या वतीने येथील सनातनच्या आश्रमात ६ जानेवारी २०२३ या दिवशी कन्नड भाषेतील साधना शिबिराला चैतन्यमय वातावरणात आरंभ झाला. शिबिराच्या प्रारंभी शंखनाद करण्यात आला. त्यानंतर बागलकोट (कर्नाटक) येथील हितचिंतक श्री. शिवनगौडा बरमगौडर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि सनातनच्या साधिका सौ. मंजुळा रमानंद गौडा (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या शिबिरात कर्नाटक राज्यातील जिज्ञासू आणि हितचिंतक सहभागी झाले आहेत.
या शिबिरात ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कार्याचा परिचय’ हा विषय श्री. मोहन गौडा आणि श्री. शरद कुमार यांनी मांडला. ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ हा विषय सौ. मंजुळा गौडा आणि श्री. अरुण कुलकर्णी यांनी, तर ‘गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व’ हा विषय सौ. मंजुळा गौडा अन् कु. रेवती मोगेर यांनी मांडला.