मुंबईतील प्रभादेवी मंदिरासमोर ‘सेंट थॉमस चर्च’ उल्लेख असणारा महापालिकेने नव्याने बसवलेला ब्रिटीशकालीन मैलाचा दगड हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर प्रशासनाने हटवला !

ब्रिटीशकालीन मैलाच्या दगडांचा संवर्धन करणारा महानगरपालिकेचा पुरातन वास्तू जतन विभाग कधी हिंदूंच्या ऐतिहासिक वस्तूंचे जतन करतो का ?

पुण्यातील ‘महामेट्रो’चा राडारोडा मुठा नदीपात्रात टाकला जात आहे !

यादवाडकर यांनी सांगितले की, नदीपात्रांमध्ये आधीच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत. त्यामुळे गेल्या २-३ वर्षांपासून नदीची वहनक्षमता अल्प होत आहे.

पुणे येथील गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या पोलिसांवर जमावाने केले आक्रमण !

यावरून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक वाटत नाही, हेच लक्षात येते ! स्वत:चेही रक्षण करू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांपासून जनतेचे रक्षण कसे करणार ?

मोजणी करून लवकरच विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्यास प्रारंभ होईल ! – राहुल रेखावार, जिल्हाधिकारी

विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने ३१ डिसेंबर या दिवशी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेतली. मोजणी पूर्ण करून लवकरच अतिक्रमण हटवण्यास प्रारंभ होईल, अशी माहिती कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात १ सहस्र २८९ बालके मध्यम कुपोषित आणि ३७१ बालके अतीतीव्र कुपोषित !

एका पुणे जिल्ह्यात सहस्रो बालके कुपोषित असणे चिंताजनक आहे. ही महाराष्ट्राची प्रगती म्हणायची का ? बालक म्हणजे देशाची भावी पिढी, हे लक्षात घेऊन कुपोषित बालकांचे प्रमाण अल्प करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

मॅक्रॉन आणि मशिदी !

फ्रान्समधील मुसलमानांमध्ये वाढत्या कट्टरतावादाला तेथील मशिदींमधून देण्यात येणारे शिक्षण कारणीभूत आहे. हे लक्षात आल्यावर मॅक्रॉन यांनी मशिदींवर कारवाया करण्याचा सपाटा लावला. यामुळे मानवाधिकारवाल्यांनी नाके मुरडण्याचे कारण नाही. अभिव्यक्तीस्वातंत्र्य कि राष्ट्रवाद या दोघांपैकी जेव्हा एकाची निवड करण्याची वेळ येते, तेव्हा सुजाण समाज राष्ट्रवादाची निवड करतात.

पाटण (सातारा) येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या !

पाटण (जिल्हा सातारा) येथील रुवले (सुतारवाडी) येथे २९ डिसेंबर या दिवशी ७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून  गळा आवळून तिची हत्या करण्यात आली.

बनावट वैद्यकीय व्यावसायिक शोधून कारवाई करा ! – शेखर सिंह, जिल्हाधिकारी

अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक प्रतिबंधक आणि कार्यवाही समितीची सभा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहामध्ये झाली, तेव्हा ते बोलत होते. या वेळी विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

चर्च आणि मशिदी ही सरकारची संपत्ती का नाही ?

कर्नाटकच्या भाजप सरकारने राज्यातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी, ‘सरकार एक ऐतिहासिक चूक करत आहे. मंदिरे सरकारची संपत्ती आहे’, असे म्हटले.

राष्ट्रविरोधी षड्यंत्र आणि साधनेची आवश्यकता !

देशात दंगल घडवून कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या धर्मांध संघटनांवर सरकार बंदी केव्हा घालणार ?