सातारा, ३१ डिसेंबर (वार्ता.) – शहरी आणि ग्रामीण भागांतील बनावट वैद्यकीय व्यावसायिक शोधून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संबंधित प्रशासकीय अधिकार्यांना दिल्या.
अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक प्रतिबंधक आणि कार्यवाही समितीची सभा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहामध्ये झाली, तेव्हा ते बोलत होते. या वेळी विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, ‘‘बनावट वैद्यकीय व्यावसायिकांनी औषधे दिल्यामुळे रुग्णांची शारीरिक हानी होऊ शकते. काही रुग्णांना कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकते, तर काहींना प्राण गमवावा लागू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागांतील अशा बनावट वैद्यकीय व्यावसायिकांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी.