संस्कृत आणि मराठी भाषा सर्वाधिक सात्त्विक ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा

आपण आणि ‘ज्यांच्याशी आपण संवाद साधत असतो ते’, यांवरही आपल्या भाषेतील स्पंदनांचा परिणाम होत असतो. व्यापक स्तरावर एखाद्या समाजातील प्रमुख भाषेचा तेथील संस्कृतीवर परिणाम होत असतो. भाषा ‘त्यांतील स्पंदने आणि त्यांचा व्यक्तींवर होणारा परिणाम’ यांत कशा भिन्न असतात ?…….

सनातनचे संत पू. चत्तरसिंग इंगळे यांच्या पार्थिव देहावर फोंडा येथे भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार !

मूळचे दुर्ग (छत्तीसगड) येथील आणि  सनातनच्या रामनाथी आश्रमात वास्तव्यास असलेले सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंग इंगळे (वय ९२ वर्षे) यांनी २९ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजता देहत्याग केला.

कराड (जिल्हा सातारा) येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने महाआरती !

आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी हिंदुत्वनिष्ठ एकवटले !

चिनी नागरिकांच्या टोळ्यांचा सहभाग असलेल्या बेंगळुरूस्थित ‘लोन अ‍ॅप’ टोळीला अटक !

‘लोन अ‍ॅप’च्या माध्यमातून नागरिकांना धमकावून खंडणी उकळणार्‍या सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या देशभर धुमाकूळ घालत आहेत. पुणे पोलिसांनी बेंगळुरू येथील ‘लोन ॲप’च्या ‘कॉल सेंटर’वर धाड टाकून ११ जणांना कह्यात घेतले.

हिंदु राष्‍ट्राची मागणी करणे, हा हिंदूंचा घटनात्‍मक अधिकार आहे ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

जगात अन्य धर्मियांची बरीच राष्ट्रे आहेत; पण भारत धर्मनिरपेक्ष देश असल्‍याने जगात हिंदूंचे एकही हिंदु राष्‍ट्र नाही. हिंदूंना सुरक्षित वाटेल अशा हिंदु राष्‍ट्राची मागणी करणे, हा हिंदूंचा घटनात्‍मक अधिकार आहे.

शिंदे गटात सहभागी होत नसल्याने माजी नगरसेवकाला ठार मारण्याची पोलीस उपायुक्तांची धमकी !

राजन विचारे यांनी सांगितले की, ठाणे, कल्याण, नवी मुंबई येथे अशा प्रकारे पोलिसांच्या माध्यमातून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची, तसेच प्रत्यक्ष गुन्हे नोंद करून शिंदे गटात दबाव आणला जात आहे.

हिंदु भगिनींनो, अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी दुर्गास्वरूप व्हा ! – सौ. मंगला दर्वे

आज कायद्याचा धाक न उरल्याने महिलांची छेड काढणे, विनयभंग, तसेच बलात्कार करणे या घटनांमध्ये पुष्कळ वाढ होत आहे. हिंदु भगिनींनी या विरोधात लढायला सिद्ध करण्यासाठी साक्षात् दुर्गास्वरूप बनले पाहिजे.

अमरावती येथे पी.एफ्.आय. संघटनेच्या जिल्हा संयोजकाच्या दुकानावर पोलिसांची धाड !

या वेळी पोलिसांनी काही साहित्य या ठिकाणाहून जप्त केले आहे. या दुकानाचा वापर तो ‘पी.एफ्.आय.’च्या कामकाजासाठी करत असल्यामुळे ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.

कांदिवली (मुंबई) येथे गोळीबारात १ जण ठार !

कांदिवलीमध्ये लालजीपाडा येथे ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या २ व्यक्तींनी केलेल्या गोळीबारामध्ये १ जण ठार झाला असून ३ जण घायाळ झाले आहेत. परस्पर वादातून गोळीबार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

धुळे येथे नवरात्रोत्सवात सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद !

येथील आई एकविरादेवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनास जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाचे उद्घाटन मंदिराचे मुख्य विश्वस्त श्री. सोमनाथजी गुरव आणि सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते..