कांदिवली (मुंबई) येथे गोळीबारात १ जण ठार !

मुंबई – कांदिवलीमध्ये लालजीपाडा येथे ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या २ व्यक्तींनी केलेल्या गोळीबारामध्ये १ जण ठार झाला असून ३ जण घायाळ झाले आहेत. परस्पर वादातून गोळीबार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सी.सी.टी.व्ही. कॅमेर्‍यामध्ये या प्रसंगाचे चित्रीकरण झाले आहे. माजी नगरसेवक कमलेश यादव यांनी दहीहंडीच्या भांडणातून गोळीबार झाल्याची शक्यता वर्तवली आहे. पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. यापूर्वी ९ सप्टेंबर या दिवशी वांद्रे येथेही गोळीबार झाला होता.

संपादकीय भूमिका 

असुरक्षित मुंबई !