सनातनचे संत पू. चत्तरसिंग इंगळे यांच्या पार्थिव देहावर फोंडा येथे भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार !

पू. चत्तरसिंग इंगळेआजोबा

फोंडा, १ ऑक्टोबर (वार्ता.) – मूळचे दुर्ग (छत्तीसगड) येथील आणि  सनातनच्या रामनाथी आश्रमात वास्तव्यास असलेले सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंग इंगळे (वय ९२ वर्षे) यांनी २९ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजता देहत्याग केला. त्यांच्यावर १ ऑक्टोबर या दिवशी फोंडा येथील स्मशानभूमीत त्यांचे धाकटे सुपुत्र श्री. नरेंद्र इंगळे यांनी भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार केले. या वेळी त्यांचे मधले सुपुत्र श्री. राजेंद्र इंगळे, श्री. राजेंद्र यांची पत्नी सौ. शैला, धाकटी सून सौ. शालिनी नरेंद्र इंगळे, नातू अक्षय इंगळे, तसेच सनातनचे साधक उपस्थित होते.

तत्पूर्वी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ,श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी पू. चत्तरसिंग इंगळे यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेतले.