आंदोलनानंतरही केवळ २ विषयांना उत्तरपत्रिकेची प्रत आणि पुनर्मूल्यांकन सुविधा देण्याचा निर्णय !

स्वतःला विद्यार्थीकेंद्रीत म्हणवणार्‍या सोलापूर विद्यापिठाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत, असे विद्यार्थी आणि पालक यांना वाटल्यास चूक ते काय ?

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंबादास दानवेंसह इतर नेते आणि कार्यकर्ते यांची निर्दोष मुक्तता !

केंद्र सरकारच्या धोरणामुळे महागाईत प्रचंड वाढ झाल्याच्या निषेधार्थ कोरोना महामारीच्या काळात येथे शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत पोलिसांची अनुमती नाकारूनही मोर्चा काढून जाहीर सभा घेतली होती.

‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा !

गडहिंग्लज आणि पेठवडगाव, तसेच निपाणी (कर्नाटक) येथे हलाल सक्तीविरोधी कृती समितीचे निवेदन

तुम्ही राष्ट्रप्रेमी असाल, तर ‘हलाल’ उत्पादनांवर बहिष्कार घाला ! – शरद पोंक्षे यांचे आवाहन

हलाल प्रमाणित उत्पादनांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या आतंकवाद्यांच्या समांतर अर्थव्यवस्थेचा धोका ओळखा !

अभिनेत्री मनवा नाईक यांना ‘उबेर’ कॅबचालकाकडून धमकी !

दोषीवर कारवाई करण्याचे मुंबईच्या सहपोलीस आयुक्तांचे आश्वासन !

पुणे येथे ‘ब्रेक’ निकामी झालेली शिवशाही बस धडकून अनेक गाड्यांची हानी !

पुण्यात पाषाण-सुस परिसरात भीषण अपघाताची घटना घडली. पाषाण-सूस रस्त्यावर शिवशाही बसचा ‘ब्रेक’ निकामी झाल्याने ही बस चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली आणि तिने दिलेल्या धडकेत ७-८ गाड्यांची हानी झाली आहे.

धारावीचा पुनर्विकास झाल्यासच मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल ! – एस्.व्ही.आर्. श्रीनिवास, मुख्य कार्यकारी अधिकारी, धारावी पुनर्विकास प्रकल्प

‘गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत नागरिकांचे लोंढे येत आहे. प्रतिदिन साधारणतः २०० कुटुंबे मुंबईत स्थलांतरित होतात. एका घंट्याला १० ते १५ कुटुंबे मुंबईत येतात. त्यामुळे झोपडपट्टी ही मोठी समस्या ठरली आहे’, असेही श्रीनिवास म्हणाले.

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न

मराठा क्रांती मोर्चाची चळवळ फोडण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आल्याची एक ध्वनीचित्रफीतही प्रसारित होत असल्याने त्यांनी हा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार चालू आहेत.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मनसेचा कुणालाही पाठिंबा नाही ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मनसे कुणालाही पाठिंबा देणार नाही, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. पाठिंब्यासाठी भाजपकडून आलेल्या विनंतीला धुडकावून लावत ‘भाजपनेच या निवडणुकीतून माघार घ्यावी’,

‘नार्काेटिक’ युद्ध !

अमली पदार्थ व्यवहारातील कायदेही शिथिल आहेत. त्यामुळे या व्यवहारातील गुन्हेगारांना सहज जामीन मिळतो आणि ते पुन्हा तोच व्यवहार करतात. थोडक्यात ही सामाजिक समस्या नसून राष्ट्रीय समस्या असल्याने त्याविषयी राष्ट्रीय स्तरावरच कठोर धोरण अवलंबणे आवश्यक बनले आहे !