धारावीचा पुनर्विकास झाल्यासच मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल ! – एस्.व्ही.आर्. श्रीनिवास, मुख्य कार्यकारी अधिकारी, धारावी पुनर्विकास प्रकल्प

मुंबई – मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण वर्ष १९९५ पासून झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवत आहे; मात्र जेव्हा धारावीचा पुनर्विकास होईल, तेव्हाच खर्‍या अर्थाने मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल, असे मत धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे (डी.आर्.पी.चे) मुख्य कार्यकारी अधिकारी एस्.व्ही.आर्. श्रीनिवास यांनी व्यक्त केले. ‘मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ॲट २०३४’ या विशेष परिषदेत ते बोलत होते.

‘गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत नागरिकांचे लोंढे येत आहे. प्रतिदिन साधारणतः २०० कुटुंबे मुंबईत स्थलांतरित होतात. एका घंट्याला १० ते १५ कुटुंबे मुंबईत येतात. त्यामुळे झोपडपट्टी ही मोठी समस्या ठरली आहे’, असेही श्रीनिवास म्हणाले.