आम्ही बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये  ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

राज्यात मोठे परिवर्तन झाले. जगातील ३३ देशांची याची नोंद घेतली. हा उठाव होता. हा संघर्ष सत्तेसाठी नव्हता.   नगरसेवकही सत्ता सोडत नाही. आम्ही सत्तेचा त्याग करून गेलो. आम्ही मिंधे नव्हे, तर बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये आहोत, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देहली येथे केले.

श्री विठ्ठल मंदिरातील कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांचे तात्काळ निलंबन करावे ! – राष्ट्रीय वारकरी परिषद

श्री विठ्ठल मंदिरात भजन आणि कीर्तन करण्यास बंदी घातल्याचे प्रकरण

हिंदु राष्ट्र संघटनेच्या अध्यक्षांवर आक्रमणप्रकरणी ३ पोलिसांवर निलंबनाची कारवाई !

तुषार हंबीरे यांच्यावर आक्रमण झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ ८ आरोपींना अटक केली आहे. त्यांची चौकशी केली असता जुन्या प्रकरणाच्या रागातून हे आक्रमण केल्याची माहिती समोर आली आहे.

जे.एन्.पी.टी. बंदरातून २० सहस्र किलो अमली पदार्थ जप्त !

इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा व्यवसाय करण्यात येतो आणि सुरक्षा यंत्रणांना त्याविषयीची माहिती कशी मिळत नाही ?

रेल्वेस्थानकांत आतंकवादी शिरल्याचा दूरभाष करणार्‍या आरोपीला अडीच मासांनी अटक

एखाद्या गुन्हेगाराला शोधून काढण्यास अडीच मास लावणारे पोलीस देशांतर्गत लपून बसलेल्या शेकडो आतंकवाद्यांचा बिमोड करण्यास किती वर्षे लावणार ?

चंद्रभागेसह इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या बैठकीत ठराव !

येथील रंगभवन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षपदी ह.भ.प. दत्तात्रय महाराज क्षीरसागर होते.

हिंदूंसाठी असुरक्षित इंग्लंड !

भारत सरकार हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांच्या संदर्भात एकतर निषेध नोंदवत नाही आणि नोंदवला, तर तो मुळमुळीत असतो. परिणामी तेथील हिंदूंचे जीवन असुरक्षित झाले आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी एकीने रहाणे आणि भारतीय वकिलातीवर, भारत सरकारवर सातत्याने दबाव टाकणे आवश्यक आहे !

बदलापूर-वांगणी (जिल्हा ठाणे) जवळच्या ग्रामीण भागात बिबट्याचा वावर, नागरिक भयभीत

बदलापूर- वांगणी जवळच्या ग्रामीण भागांत मागील काही दिवसांपासून बिबट्याने कोंबड्या फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. गावामध्ये बिबट्याच्या पाऊलखुणाही उमटल्याचे गावकर्‍यांना आढळले आहे.

संभाजीनगर येथील ‘पंप हाऊस’मधील पंपामध्ये उंदीर शिरल्याने ११ घंटे पाणीपुरवठा खंडित !

१८ सप्टेंबरच्या रात्री शहरातील जायकवाडी येथील ‘पंप हाऊस’च्या एका पंपामध्ये उंदीर शिरल्याने ‘स्पार्किंग’ होऊन पंप हाऊसमध्ये बिघाड झाला आणि संपूर्ण यंत्रणा बंद पडली.

वेठबिगारीसाठी नेऊन भिवंडी येथील अल्पवयीन मुलांना राबवणार्‍या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद !

नाशिक, नगर या भागांत भिवंडी येथील लहान बालकांना मेंढ्या राखण्यासाठी त्यांच्या पालकांना कवडीमोल पैसे देऊन मेंढपाळ घेऊन गेले होते. त्यांना वेठबिगारीसाठी नेऊन राबवले जात असल्याचे उघड झाले आहे.