संभाजीनगर येथील ‘पंप हाऊस’मधील पंपामध्ये उंदीर शिरल्याने ११ घंटे पाणीपुरवठा खंडित !

संभाजीनगर – १८ सप्टेंबरच्या रात्री शहरातील जायकवाडी येथील ‘पंप हाऊस’च्या एका पंपामध्ये उंदीर शिरल्याने ‘स्पार्किंग’ होऊन पंप हाऊसमध्ये बिघाड झाला आणि संपूर्ण यंत्रणा बंद पडली. त्याचा परिणाम म्हणून जायकवाडी येथून होणारा पाणीपुरवठा तब्बल ११ घंटे बंद राहिला. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक या घटनेमुळे पुन्हा एक दिवसाने पुढे ढकलले गेले आहे.

संपादकीय भूमिका

पाण्याच्या पंपात उंदीर शिरण्याएवढी जागा आहे, याचा अर्थ जलवाहिन्यांची यंत्रणा तांत्रिकदृष्ट्या अयोग्य आहे, तसेच पंप हाऊस असुरक्षित आहे, असा होतो. याविषयी संबंधित उत्तरदायींनी उत्तर द्यायला हवे !