ठाणे, २१ सप्टेंबर (वार्ता.) – बदलापूर- वांगणी जवळच्या ग्रामीण भागांत मागील काही दिवसांपासून बिबट्याने कोंबड्या फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. गावामध्ये बिबट्याच्या पाऊलखुणाही उमटल्याचे गावकर्यांना आढळले आहे. आठवडाभरापूर्वी गोरेगाव येथील ४ कोंबड्याही बिबट्याने फस्त केल्या होत्या, तर सुमारे १५ दिवसांपूर्वी कासगाववाडी येथे जंगलात चरण्यासाठी गेलेल्या रघुनाथ शिंदे यांच्या २ बकर्या बिबट्याने फस्त केल्या होत्या. कासगाव परिसराकडे बिबट्याने मोर्चा वळवला असल्यामुळे स्थानिक नागरिक धास्तावले आहेत.