नवी मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्यावरील हरकती आणि सूचनांची मुदत ६० दिवसांनी वाढवली

नवी मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्यावरील हरकती आणि सूचना सादर करण्याची मुदत ६० दिवसांनी वाढवण्यात येत असल्याचे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी घोषित केले आहे.

नाशिक येथील स्वामीनारायण संप्रदायामुळे भारतियांचे विचार आणि संस्कृती यांना वैश्विक आयाम लाभला! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

बी.एस्.पी.एस्. स्वामीनारायण संप्रदाय हा १५० हून अधिक सेवाभावी आणि विधायक उपक्रमांच्या माध्यमातून जगभर कार्यरत आहे. त्याग भावनेतून भारतियांचे विचार आणि संस्कृती यांना या संप्रदायामुळे वैश्विक आयाम लाभला आहे.

संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांत १५६ जणांना भगर खाल्ल्याने विषबाधा !

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या आणि त्यांना अप्रत्यक्षरित्या फसवणार्‍या या दुकानदारांचे परवाने रहित करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी !

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते, ते आमच्याकडे आहे. या देशात जे काही निर्णय होतात ते घटना, नियम यांच्या आधारेच होत असतात.

कोंढवा (पुणे) येथून पी.एफ्.आय. आणि एस्.डी.पी.आय.चे धर्मांध कह्यात !

देशविरोधी घोषणा देणे आणि एन्.आय.ए.च्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांना कह्यात घेतले आहे.

पोलीस दलातील रिक्त पदांच्या १०० टक्के भरतीला मंत्रीमंडळाची मान्यता !

२० सहस्र पोलिसांच्या भरतीचा मार्ग मोकळा ! वन्यप्राण्यांच्या आक्रमणात मरण पावलेले वन अधिकारी आणि कर्मचारी यांना हानीभरपाई मिळणार !

आतंकवादी प्रवृत्ती ठेचा !

आताच्या आधुनिक युगात आतंकवाद्यांचे आव्हान हे केवळ बाह्यतः राहिलेले नाही, तर सामाजिक माध्यमांद्वारे बौद्धिकतेपर्यंत त्याच्या कक्षा रूंदावल्या आहेत. मिळेल त्या माध्यमातून आतंकवादी त्यांच्या कारवाया करत असतात. यासाठी बंदी घालायची असेल, तर केवळ संघटनेवर न घालता त्यांच्या सामाजिक माध्यमांच्या खात्यांवरही घातली पाहिजे.

सांगली येथे पी.एफ्.आय. या संघटनेच्या विरोधात कारवाई करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने ! 

स्टेशन चौकातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर भाजप, शिवसेना, हिंदु एकता आंदोलन, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अशा हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २७ सप्टेंबर या दिवशी पी.एफ्.आय.च्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

भोगवादी संस्कृती नको !

पुण्यात सध्या पबची विकृती वाढत आहे. पब, नाईट क्लब यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकृत्ये, तसेच अनेक अवैध धंदे चालतात. महाविद्यालयीन विद्यार्थी हेच देशाचे भवितव्य आणि तेच भावी पिढीचे आदर्श असणार आहेत. त्यांना नशेच्या जाळ्यात ओढण्याचा प्रकार जाणूनबुजून होत आहे का ?

भिवंडी येथे संरक्षक भिंत पडून ६ जण घायाळ !

भिवंडी शहरातील चव्हाण वसाहतीच्या परिसरात एका मंगल कार्यालयाची धोकादायक संरक्षक भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात येत होती. भिंत शेजार्‍यांच्या घरावर कोसळल्याने ६ जण घायाळ झाले आहेत.