भिवंडी येथे संरक्षक भिंत पडून ६ जण घायाळ !

ठाणे, २८ सप्टेंबर (वार्ता.) – भिवंडी शहरातील चव्हाण वसाहतीच्या परिसरात एका मंगल कार्यालयाची धोकादायक संरक्षक भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात येत होती. भिंत शेजार्‍यांच्या घरावर कोसळल्याने ६ जण घायाळ झाले आहेत. या दुर्घटनेत रस्त्यावर खेळत असलेल्यांमध्ये ३ लहान मुलांसह २ वृद्ध आणि १ तरुणी यांचा समावेश असून एकाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.