‘ए.टी.एम्.’वर झालेल्या दरोड्याप्रकरणी पोलीस हवालदारास अटक !

ज्या पोलीस प्रशासनावर कायदा-सुव्यवस्था राखणे यांसह गुन्हेगारीचा शोध घेण्याचे दायित्व असते, त्या प्रशासनातील व्यक्तीच जर चोर असल्या, तर सामान्य नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची ? पोलीसदलाची प्रतिमा मलीन करणार्‍यांना कठोर शिक्षाच होणे अपेक्षित आहे !

जामखेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधांची वानवा !

शिक्षणासारख्या सेवा पुरवतांना मूलभूत सुविधा नसणे, हे गंभीर आणि संतापजनक आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांची ही दूरवस्था होण्यास कारणीभूत असणार्‍यांना कडक शासनच हवे !

नाशिक येथे अल्पवयीन मुलींचे अपहरण करणार्‍या चौघांना अटक !

आरोपींना कठोर शासन झाल्याविना अपहरणाच्या घटना थांबणार नाहीत !

उर्दू भाषेच्या एम्.ए.च्या विद्यार्थ्यांना उत्तराच्या खुणांसह हस्तलिखित प्रश्नपत्रिका दिल्या !

असे प्रकार होतातच कसे ? सातत्याने विद्यापिठात भोंगळ कारभार कसा काय चालू रहातो ? यावर कुणाचा अंकुश नाही का ? आतातरी संबंधितांवर कठोर कारवाई करावी !

साखर आयुक्तांनी दिले किसन वीर कारखान्याच्या जप्तीचे आदेश !

जिल्ह्यातील भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याचा यात समावेश असून ऊस गाळप हंगाम वर्ष २०२१-२२ चे ४ कोटी ११ लाख ९१ सहस्र रुपये थकीत आहेत.

भारतात मात्र नमाजासाठी शुक्रवारी मिळते सुटी !

बांगलादेशच्या शिक्षण मंत्रालयाने शालांत परीक्षेचे वेळापत्रक घोषित केले आहे. यात दुर्गापूजेच्या वेळी परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सर्व राजकीय पक्षांनी हिंदूंना ९ राज्यांत अल्पसंख्य होऊ दिले !

‘काश्मीर, लडाख, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मेघालय, मणीपूर आणि लक्षद्वीप ही राज्ये अन् केंद्रशासित प्रदेश यांमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत. हिंदूंना अल्पसंख्यांक असल्याचा लाभ मिळत नाही. याचा लाभ त्या राज्यांमधील बहुसंख्यांकांना मिळत आहे.

पाकिस्तानचा पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद वाढवण्याचा प्रयत्न !

येणार्‍या काळात पंजाबला सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करायला पाहिजे. गेल्या काही मासांचा आढावा घेतला, तर हिमाचल प्रदेशच्या विधीमंडळाच्या ठिकाणीही खलिस्तान्यांनी खलिस्तानी आतंकवादाची भित्तीपत्रके लावण्याचा प्रयत्न केला होता.

आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

‘सूतशेखर रस’ या औषधाच्या एका गोळीचे बारीक चूर्ण करावे. (एका ताटलीत गोळी ठेवून तिच्यावर पेल्याने किंवा वाटीने दाब दिल्यास गोळीचे चूर्ण होते.) हे चूर्ण तपकीर ओढतात त्याप्रमाणे नाकात ओढावे.

‘अग्नीपथ’ योजना देश आणि तरुण पिढी यांच्या दृष्टीने लाभदायी !

जेव्हा जेव्हा केंद्र सरकार एखादी लोकाभिमुख योजना आणते, तेव्हा राजकीय हेतू ठेवून त्याविरोधात वातावरण निर्माण केले जाते. कोणतीही पूर्ण माहिती न घेता त्याविरोधात लोकांना भडकावले जाते. त्याचे ताजे उदाहरण, म्हणजे ‘अग्नीपथ’ योजनेला होत असलेला विरोध !