उर्दू भाषेच्या एम्.ए.च्या विद्यार्थ्यांना उत्तराच्या खुणांसह हस्तलिखित प्रश्नपत्रिका दिल्या !

सोलापूर विद्यापिठाच्या परीक्षेतील चुकांची मालिका चालूच

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठामध्ये एम्.ए.च्या उर्दू भाषेच्या परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना हस्तलिखित आणि उत्तराच्या खुणा असलेली प्रश्नपत्रिका देण्यात आली. एम्.ए. उर्दू विषय विद्यापीठ अधिविभागातील भाषा संकुलात आहे. यासाठी २० विद्यार्थी आहेत.

१४ जुलैपासून चालू झालेल्या विद्यापिठाच्या परीक्षेत सातत्याने भोंगळ कारभार समोर येत आहे. विद्यापिठातच एम्.ए., एम्.एस्.सी., एम्.बी.ए. या परीक्षांच्या वेळी विद्यार्थी अधिक आणि आसनव्यवस्था अल्प असणे, असे प्रकार नेहमीच समोर येत आहेत. (असे प्रकार होतातच कसे ? सातत्याने विद्यापिठात भोंगळ कारभार कसा काय चालू रहातो ? यावर कुणाचा अंकुश नाही का ? आतातरी संबंधितांवर कठोर कारवाई करावी ! – संपादक)

प्रकार गंभीर असून संबंधितांवर कडक कारवाई करणार ! – डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरु, सोलापूर विद्यापीठ

प्रश्नपत्रिकेवर उत्तराच्या खुणा असलेला पेपर विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी देण्यात आलेल्या प्रकाराची गंभीर नोंद विद्यापिठाने घेतली आहे. हा अत्यंत अयोग्य प्रकार असून कडक कारवाई करत आहोत.