स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सर्व राजकीय पक्षांनी हिंदूंना ९ राज्यांत अल्पसंख्य होऊ दिले !

‘काश्मीर, लडाख, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मेघालय, मणीपूर आणि लक्षद्वीप ही राज्ये अन् केंद्रशासित प्रदेश यांमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत. हिंदूंना अल्पसंख्यांक असल्याचा लाभ मिळत नाही. याचा लाभ त्या राज्यांमधील बहुसंख्यांकांना मिळत आहे. मिझोराम, मेघालय आणि नागालँड या राज्यांमध्ये ख्रिस्ती बहुसंख्य आहेत, तसेच अरुणाचल प्रदेश, गोवा, केरळ, मणीपूर, तमिळनाडू आणि बंगाल या राज्यांमध्ये ख्रिस्त्यांची संख्या लक्षणीय आहे. पंजाबमध्ये शीख बहुसंख्य आहेत, तर देहली आणि हरियाणा राज्यांमध्ये शीख लोकांची संख्या लक्षणीय आहे. तरीही त्यांना अल्पसंख्यांक मानले जाते.’