साखर आयुक्तांनी दिले किसन वीर कारखान्याच्या जप्तीचे आदेश !

सातारा – एफ्.आर्.पी.च्या संदर्भात १४५ कोटी रुपये थकल्याने राज्यातील ७ साखर कारखान्यांवर महसूल वसुली प्रमाणपत्रानुसार जप्तीचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याचा यात समावेश असून ऊस गाळप हंगाम वर्ष २०२१-२२ चे ४ कोटी ११ लाख ९१ सहस्र रुपये थकीत आहेत.