‘ए.टी.एम्.’वर झालेल्या दरोड्याप्रकरणी पोलीस हवालदारास अटक !

जेव्हा कुंपणच शेत खाते…

सांगली, २ ऑगस्ट (वार्ता.) – जत तालुक्यातील डफळापूर येथे २ दिवसांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रच्या ‘ए.टी.एम्.’वर दरोडा टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. या प्रकरणाचे जत पोलिसांनी अधिक अन्वेषण केले असता याचा सूत्रधार कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सचिन कोळेकर असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या प्रकरणात सचिन कोळेकर अणि त्याचा साथीदार सुहास शिवशरण यांना अटक करण्यात आली आहे. (ज्या पोलीस प्रशासनावर कायदा-सुव्यवस्था राखणे यांसह गुन्हेगारीचा शोध घेण्याचे दायित्व असते, त्या प्रशासनातील व्यक्तीच जर चोर असल्या, तर सामान्य नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची ? पोलीसदलाची प्रतिमा मलीन करणार्‍यांना कठोर शिक्षाच होणे अपेक्षित आहे ! – संपादक)