हास्यास्पद साम्यवाद !
‘अध्यात्मातील ‘प्रारब्ध’ या शब्दाकडे आणि ईश्वराकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे साम्यवाद १०० वर्षांतच समाप्त व्हायला आला आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘अध्यात्मातील ‘प्रारब्ध’ या शब्दाकडे आणि ईश्वराकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे साम्यवाद १०० वर्षांतच समाप्त व्हायला आला आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
प्रेमभाव, स्थिरता आणि देवावर दृढ श्रद्धा असणार्या पुणे येथील श्रीमती मालती नवनीतदास शहा (वय ८३ वर्षे) या सनातनच्या १२० व्या व्यष्टी संतपदावर विराजमान झाल्याची आनंदवार्ता सद्गुरु स्वाती खाडये यांनी ४ ऑगस्ट या दिवशी दिली.
सध्या वाढत असलेले प्रदूषण पहाता आज प्रत्येक भारतियाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून सनातन संस्थेच्या वतीने अलकनंदा येथील ‘मंदाकिनी एन्क्लेव्ह’ या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
‘एम्स परिवारा’च्या वतीने सारनाथ, वाराणसी येथे शैक्षणिक कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार लातूर येथील डॉ. जगन्नाथ पाटील यांना देण्यात आला. श्रीमान इंद्रेशकुमारजी आणि केंद्रीय तिब्बत विद्यापिठाचे कुलपती डॉ. गेशे समतेनजी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत उपलब्ध न झाल्याने दोष निश्चितीसाठी पुढील सुनावणी आता २३ ऑगस्टला होणार आहे. ही सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू असून संशयितांच्या वतीने अधिवक्ता समीर पटवर्धन हे काम पहात आहेत.
पावसाळ्याच्या कालावधीमध्ये विशेषत: ग्रामीण भागांत अतीवृष्टीमुळे पूल वाहून जातात. काही वेळा पुलावरून पाणी जाते. यांमुळे पुलाला जोडणार्या दोन्ही बाजूंचे रस्ते बाधित होऊन पुलावरील वाहतूक बंद होते.
शहरात ‘स्वाईन फ्ल्यू’चा संसर्ग वाढत असून शहरातील विविध रुग्णालयांत या आजाराचे ४६ रुग्ण भरती झाले आहेत, तर आतापर्यंत ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून दोघे ‘व्हेंटिलिटर’वर आहेत, अशी माहिती महापालिकेने ५ ऑगस्ट या दिवशी दिली आहे.
मागील ३ वर्षांपासून बंद असलेली ‘मिरज-परळी वैद्यनाथ-मिरज रेल्वे चालू करावी’, या मागणीचे निवेदन ‘हुतात्मा अशोक कामटे’ या बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने मध्य रेल्वे विभाग, सोलापूर यांना देण्यात आले.
राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत हे भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचे मानबिंदू आहेत. त्यांचा योग्य तो मान राखला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही चळवळ राबवली जाते.
‘अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग’ आणि ‘गुरुपीठ त्र्यंबकेश्वर’ अंतर्गत ‘सक्रिय आरोग्यदूत’ अभियानाच्या वतीने गंगा गोदावरी स्वच्छता, गरजूंना वस्त्रदान, आरोग्य पडताळणी अन् विनामूल्य औषधोपचार अशी मोहीम हाती घेण्यात आली आहे.