गोंदिया येथे धर्मप्रेमींकडून शाळांमध्ये मुख्याध्यापकांना निवेदन !

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ चळवळ

नागपूर, ५ ऑगस्ट (वार्ता.) – राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत हे भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचे मानबिंदू आहेत. त्यांचा योग्य तो मान राखला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही चळवळ राबवली जाते. या अंतर्गत समितीच्या वतीने धर्मप्रेमी श्री. वैभव खोब्रागडे आणि श्री. राजेश सिंहमारे यांनी गोंदिया जिल्ह्यातील दवनिवाडा येथील शाळांमध्ये मुख्याध्यापकांना निवेदन दिले. अशाच प्रकारचे निवेदन तिरोडा आणि वाहाणी येथेही देण्यात आले.