पूर व्यवस्थापनाचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

भविष्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास कोणतीही अडचण भासू नये, यादृष्टीने पूर व्यवस्थापनासाठी सर्व विभागांना आवश्यक साधनसामग्री आणि उपाययोजना यांचा समावेश असणारा जिल्ह्याचा एकत्रित परिपूर्ण प्रस्ताव राज्यशासनाकडे सादर करावा,.

औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामकरण करण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न १६ जुलै या दिवशी पूर्ण करणार ! – मुख्यमंत्री

औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामकरण करणे, हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आहे. ते आम्ही १६ जुलै या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये पूर्ण करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

भारताला मिळालेला धडा !

इराण आणि तैवान या देशांनी आसाममधून निर्यात केलेला सुमारे ४० सहस्र किलो चहा परत केला आहे. चहामध्ये निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक कीटकनाशके असल्याचे कारण त्यांनी दिले. यामुळे भारतात ५३ टक्के चहाचे उत्पादन करणाऱ्या आसामच्या उत्पादकांची पुष्कळ हानी झाली आहे.

‘कुंकळ्ळीच्या महानायकां’ची माहिती पाठ्यक्रमामध्ये समाविष्ट करण्याला गोवा विधानसभेत मान्यता !

‘कुंकळ्ळीच्या महानायकांची माहिती शाळा आणि महाविद्यालय यांच्या अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करावी’, अशी मागणी करणारा कुंकळ्ळीचे काँग्रेसचे आमदार युरी आलेमांव यांनी विधानसभेत १५ जुलै या दिवशी मांडलेला खासगी ठराव सर्वानुमते संमत झाला.

पन्हाळा गडाच्या दुरुस्तीसाठी भरीव तरतूद करा आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळा गड येथे ४ दिवसांपूर्वी चार दरवाजा जवळील तटबंदी आणि बुरूज ढासळला आहे.

भारताला समृद्ध करणारे ज्ञान आदिवासींकडे ! – गिरीश प्रभुणे, लेखक

मागास, भटक्या आणि आदिवासींकडे प्रचंड पारंपरिक ज्ञान आहे. या ज्ञानामुळेच प्राचीन काळात भारत समृद्ध होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले. गिरीश प्रभुणे यांनी लिहिलेल्या ‘परिसांचा संग’ या पुस्तकाचे प्रकाशन संस्कृती मंडळाच्या सभागृहात झाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुरुपौर्णिमा महोत्सवांतील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

कार्यक्रमस्थळी सर्वांत अधिक देवगड येथे ५००, तर त्याखालोखाल कुडाळ येथे ४५०  उपस्थिती होती.

मारहाण करणार्‍या २ धर्मांधांना न्यायालय उठेपर्यंत उभे रहाण्याची शिक्षा !

ही घटना १५ सप्टेंबर २०१६ या दिवशी घडली होती. या प्रकरणी न्यायाधिशांनी ठोठावलेल्या शिक्षेच्या विरोधात प्रविष्ट केलेल्या अपिलात आरोपींना न्यायालय उठेपर्यंत उभे रहाण्याची आणि प्रत्येकी ७ सहस्र ५०० रुपये दंडाची शिक्षा १३ जुलै या दिवशी न्यायाधिशांनी केली.

कावड यात्रा भारतात होते कि पाकिस्तानात ?

उत्तर भारतात प्रारंभ झालेल्या कावड यात्रेवर जिहाद्यांकडून आक्रमण होण्याची शक्यता असल्याने सतर्क रहाण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिली. या यात्रेकरूंची सुरक्षा तात्काळ वाढवण्याचा आदेशही देण्यात आला आहे.

सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्हणजे मंदिराच्या उत्पन्नावर दरोडा टाकणे !

‘मंदिरे शासनाच्या कह्यात गेली की, मंदिराच्या उत्पन्नातून भरमसाठ उधळपट्टी आणि भ्रष्टाचार होतो. अधार्मिक कामावर पैसा वाया जातो, हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्हणजे मंदिराच्या उत्पन्नावर दरोडा टाकणे होय.’