डोंबिवली येथील आयसीआयसीआय अधिकोषातील चोरी प्रकरणी तिघांना अटक !

डोंबिवली येथील ‘आयसीआयसीआय’ अधिकोषाच्या एका शाखेमधून १२ कोटी २० लाख रुपयांची चोरी झाली. या प्रकरणी ठाणे मालमत्ता गुन्हे शोध कक्षाने इसरार कुरेशी , शमशाद खान आणि अनुज गिरी या तिघांना अटक केली आहे.

पन्हाळगडावर (जिल्हा कोल्हापूर) हुल्लडबाजांकडून ३० सहस्र रुपयांचा दंड वसूल !

शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकोटांवर लीन होऊन, तसेच काहीतरी शिकण्याच्या आणि अनुभवण्याच्या भूमिकेतून जाणे अपेक्षित आहे. आपल्या इतिहासाविषयी अभिमान निर्माण न झाल्यामुळेच युवा पिढी केवळ मौजमजा करण्यासाठी गड-दुर्गांवर जाते, हे लक्षात घ्या !

‘टोल’ चालू करण्यापूर्वीच राष्ट्रीय महामार्गावरील लोखंडी गज उघडे पडले !

पाटोदा-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावरील चुंबळी ते मांजरसुंबा १६६ कोटी रुपये व्यय करून केलेल्या ३३ किलोमीटरच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे  झाल्याने महामार्गावरील लोखंडी गज उघडे पडले आहेत. अद्याप या रस्त्यावर ‘टोल’ही चालू करण्यात आलेला नाही, त्यापूर्वीच ही दुर्दशा झाली आहे.

वायफणा (जिल्हा नांदेड) येथील कृष्ण मंदिरात पुजारी आणि ग्रामस्थ यांना घायाळ करून दानपेटीची चोरी !

चोरट्यांनी वायफणा येथील श्रीकृष्ण मंदिरातील पुजारी किशन जमजळ यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना घायाळ केले, तसेच त्यांच्याकडील रक्कम आणि मंदिरातील दानपेटी चोरून पलायन केले.

पुणे येथील महाविद्यालयाच्या परिसरामध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या देवतांच्या मूर्तींचे विधीवत् विसर्जन !

केडगाव येथील ‘सुभाष बाबुराव कुल महाविद्यालया’च्या परिसरामध्ये काही देवतांच्या मूर्ती, वीरगळ (वीरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला (सहसा दगडांचा अथवा लाकडाचा) स्तंभ असतो.

सारसोळे येथील धर्माभिमानी कैलास पाटील यांना पितृशोक !

श्री. कैलास पाटील यांनी वडिलांकडून धर्मकार्य करण्याची प्रेरणा घेऊन आता ते हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या उपक्रमांना साहाय्य करत आहेत.

महिला आयोग आपल्या दारी ?

आता नव्याने पुन्हा हा उपक्रम चालू केला, हे महिलांच्या दृष्टीने आशादायक आहे; परंतु शासनकर्त्यांनी अध्यक्षपद कुणामुळे रिक्त राहिले ? असे पुन्हा होऊ नये, यासाठी काय उपाययोजना करणार ? हेही पहायला हवे.

भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे राजस्थानचे काँग्रेस सरकार  !

भरतपूरमधील (राजस्थान) आदिबद्री धाम आणि कनकाचल येथे होत असलेल्या अवैध उत्खनन प्रकरणी साधू-संत ५५० दिवस आंदोलन करत आहेत. या वेळी ६५ वर्षीय विजय दास या संतांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

‘घातक’ मानवरहित लढाऊ विमान : भारताचे आत्मनिर्भरतेकडे एक महत्त्वाचे पाऊल

येत्या काळात संपूर्ण युद्धनीती पालटवण्याची शक्ती असलेले तंत्रज्ञान भारताने आता आत्मसात् केले आहे.

अशासकीय संस्थांची (‘एन्.जी.ओ.’ची) विश्वासार्हता !

विदेशातून निधी मिळवून देशातील विकासकामांना स्थगिती आणणार्‍या अशासकीय संस्थांचे खरे स्वरूप सरकारने उघड करावे !