Mussoorie Thook Jihad : चहामध्‍ये थुंकून तो पर्यटकांना देणार्‍या नौशाद आणि हसन अली यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद

विरोध करणार्‍याला दिली ठार मारण्‍याची धमकी

चहामध्ये थुंकताना आरोपी (डावीकडे) अटक करण्यात आलेले आरोपी (उजवीकडे)

मसुरी (उत्तराखंड) – देशाच्‍या विविध भागांतून खाद्यपदार्थांमध्‍ये थुंकून आणि लघवी करून ते पदार्थ ग्राहकांना देण्‍याच्‍या अनेक घटना सातत्‍याने उघडकीस येत आहेत.  मसुरी येथील घटनेत एक दुकानदार त्‍यामध्‍ये थुंकून लोकांना चहा प्‍यायला देत असल्‍याचा एक व्‍हिडिओ समोर आला आहे. हा व्‍हिडिओ प्रसारित झाल्‍यानंतर पोलिसांनी नौशाद आणि हसन अली या दोघांविरुद्ध गुन्‍हा नोंदवला आहे. डेहराडूनचे रहिवासी हिमांशू बिश्‍नोई यांनी पोलिसांत तक्रार केली होती. त्‍यांनी प्रत्‍यक्षात ही घटना पाहून त्‍याचा व्‍हिडिओ बनवला होता. त्‍यांनी दुकानदाराला जाब विचारल्‍यावर त्‍याने शिवीगाळ करत ठार मारण्‍याचीही धमकी दिली होती.

नौशाद मुझफ्‍फरनगर, उत्तरप्रदेश येथील रहिवासी आहे, तर हसन अली मसुरीच्‍या गड्डी खाना किताबघरचा रहिवासी आहे. गुन्‍हा नोंद झाल्‍याची माहिती मिळताच दोन्‍ही आरोपी फरार आहेत.

संपादकीय भूमिका

अशा जिहादी मानसिकतेच्‍या लोकांनाही आता फाशीची शिक्षा करावी, असेच जनतेला वाटते ! अशा प्रकारे जैविक आक्रमण करण्‍याचा जिहाद्यांचा प्रयत्न आहे, हे लक्षात घ्‍यायला हवे !