सारसोळे येथील धर्माभिमानी कैलास पाटील यांना पितृशोक !

नवी मुंबई – सारसोळे गाव (नेरूळ) येथील ‘श्री गजानन देवस्थान न्यासा’चे अध्यक्ष श्री. कैलास पाटील यांचे वडील कान्हा पाटील (वय ८७ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने १४ जुलै या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ७ मुली, १ मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कान्हा पाटील हे ‘श्री गजानन देवस्थान न्यासा’चे संस्थापक अध्यक्ष होते. हिंदु जनजागृती समितीच्या नेरूळ येथील धर्मशिक्षणवर्गाचा प्रारंभ या गणपति मंदिरातून झाला.

श्री. कैलास पाटील यांनी वडिलांकडून धर्मकार्य करण्याची प्रेरणा घेऊन आता ते हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या उपक्रमांना साहाय्य करत आहेत.