वायफणा (जिल्हा नांदेड) येथील कृष्ण मंदिरात पुजारी आणि ग्रामस्थ यांना घायाळ करून दानपेटीची चोरी !

प्रतिकात्मक छायाचित्र

नांदेड – चोरट्यांनी वायफणा येथील श्रीकृष्ण मंदिरातील पुजारी किशन जमजळ यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना घायाळ केले, तसेच त्यांच्याकडील रक्कम आणि मंदिरातील दानपेटी चोरून पलायन केले. येथे पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचा अपलाभ उठवत चोरट्यांनी हे कृत्य केले. १५ जुलैच्या रात्री श्रीकृष्ण मंदिरात ग्रामस्थ आणि पुजारी झोपले होते. तेव्हा रात्री १२ ते १५ चोरट्यांनी पुजार्‍यासह ग्रामस्थांना दगडाने घायाळ करून ही चोरी केली. चोरटे पळून जात असतांना ग्रामस्थांनी एका चोराला पकडून हदगाव पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले. पोलिसांनी घायाळ झालेल्यांना उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले आहे.

संपादकीय भूमिका

महाराष्ट्रातील हिंदूंची मंदिरे असुरक्षित !