पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर) – पन्हाळगडावर मोठ्याने ओरडत गाड्या चालवणे, वाहन परवाना नसतांना गाड्या चालवणे, दंगा करणे, गाडीला ‘नंबर प्लेट’ नसणे अशा प्रकारे हुल्लडबाजी करणार्या ३० जणांकडून पन्हाळा पोलिसांनी ३० सहस्र रुपये दंड वसूल केला. यात काही युवतींचाही समावेश आहे. ‘यापुढील काळात पन्हाळगडावर हुल्लडबाजी केल्यास कारवाई करण्यात येईल’, अशी माहिती पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी पत्रकारांना दिली.
संपादकीय भूमिकागड-दुर्गांचे पावित्र्य भंग करण्याविषयी नियम सिद्ध करून ते मोडणार्यांना कडक शासन करावे ! शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकोटांवर लीन होऊन, तसेच काहीतरी शिकण्याच्या आणि अनुभवण्याच्या भूमिकेतून जाणे अपेक्षित आहे. आपल्या इतिहासाविषयी अभिमान निर्माण न झाल्यामुळेच युवा पिढी केवळ मौजमजा करण्यासाठी गड-दुर्गांवर जाते, हे लक्षात घ्या ! |