डॉक्टरांच्या जेवणात घातक रसायने आणि क्षयरोगाच्या रुग्णालयाचे शेंबूड मिसळण्याचा होता प्रयत्न
बागपत (उत्तरप्रदेश) – येथील सरकारी डॉक्टर डॉ. यशवीर सिंह आणि त्यांचे कुटुंबीय यांंच्या हत्येचा कट रचल्याची घटना समोर आली आहे. या कटात क्षयरोग झालेल्या रुग्णाचा श्लेष्म (शेंबूड) आणि घातक रसायने डॉ. सिंह यांच्या जेवणात मिसळण्याचा कट रचण्यात आला होता. डॉक्टरांच्या तक्रारीवरून पोलिसांनी जब्बार खान आणि मुशीर अहमद यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. डॉ. सिंह यांना का मारायचे होते, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. हिंदु युवा वाहिनीने दोन्ही मुसलमान आरोपींच्या या कृत्याला ‘जैविक जिहाद’ म्हणत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
डॉ. यशवीर सिंह यांच्या म्हणण्यानुसार कंत्राटी कर्मचारी जब्बार खान आणि त्याच्या रुग्णालयामध्ये काम करणारे प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ मुशीर अहमद यांनी मिळून हा प्राणघातक कट रचला. सफाई कामगार टिंकू याने यात सहभागी होण्यास नकार दिल्याने हे उघड झाले.
संपादकीय भूमिकाअशा जिहादी मानसिकतेच्या गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे ! |