Bihar Muslim Teacher Controversial Statement : (म्‍हणे) ‘भगवान श्रीराम आणि हनुमान मुसलमान होते आणि ते नमाजपठण करायचे !’

बिहारमध्‍ये मुसलमान शिक्षकाचे हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावणारे वक्‍तव्‍य !

मुसलमान शिक्षक जियाउद्दीन (डावीकडे) व त्याला जाब विचारणारे हिंदु मुलांचे पालक (उजवीकडे)

बेगुसराय (बिहार) – बछवाडा तालुक्‍यातील कादराबाद येथील एका शाळेतील मुसलमान शिक्षक जियाउद्दीन याने वर्गातील मुलांना शिकवतांना भगवान श्रीराम आणि श्री हनुमान यांना मुसलमान म्‍हणून संबोधले. ‘ते नमाजपठण करायचे’, असेही हा शिक्षक म्‍हणाला. मुलांनी याविषयी पालकांना माहिती दिली असता ग्रामस्‍थांमध्‍ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्‍थांच्‍या विरोधानंतर शिक्षकाने क्षमा मागितली. (अशा धादांत खोटी माहिती मुलांना देणार्‍या मुसलमान शिक्षकाविषयी साम्‍यवादी प्रसारमाध्‍ये, सेक्‍युलरवादी, कथित बुद्धीप्रामाण्‍यवादी, शहरी नक्‍सलवादी ब्र काढत नाहीत; उलट एखाद्या हिंदु शिक्षकाने अल्‍पसंख्‍यांकांच्‍या धार्मिक भावना दुखावणारे विधान केले असते, तर हे सर्व जण त्‍यांच्‍यावर तुटून पडले असते, हे लक्षात घ्‍या ! – संपादक)  

हिंदु मुलांच्‍या पालकांनी शाळेत पोचून चुकीच्‍या माहिती देणार्‍या शिक्षकाला जाब विचारला. त्‍यानंतर मुख्‍याध्‍यापकांच्‍या पुढाकाराने शिक्षक जियाउद्दीन याने ग्रामस्‍थांसमोर त्‍याची चूक मान्‍य करून भविष्‍यात असे काहीही न करण्‍याचे आश्‍वासन दिले.

हिंदूंच्‍या देवतांना मुसलमान संबोधणे हे एक षड्‌यंत्र ! – केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह

या प्रकरणी बेगुसरायचे खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी तीव्र आक्षेप घेत मुख्‍यमंत्र्यांकडे या शिक्षकावर कारवाई करण्‍याची मागणी केली आहे. गिरीराज सिंह म्‍हणाले की, हिंदूंच्‍या देवतांना मुसलमाने संबोधणे हे एक षड्‌यंत्र आहे. असे चालू राहिल्‍यास समाजात तेढ पसरेल.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्‍या देवतांना ‘मुसलमान’ संबोधून धर्मांध मुसलमान हिंदूंचा बुद्धीभेद करू पहात आहेत, हे यातून लक्षात येते. असे षड्‍यंत्र हाणून पाडण्‍यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन आवश्‍यक !