डोंबिवली येथील आयसीआयसीआय अधिकोषातील चोरी प्रकरणी तिघांना अटक !

  • मुख्य आरोपी अधिकोषातील कर्मचारीच

  • १२ कोटी २० लाख रुपयांची चोरी

ठाणे, २० जुलै (वार्ता.) – डोंबिवली येथील ‘आयसीआयसीआय’ अधिकोषाच्या एका शाखेमधून १२ कोटी २० लाख रुपयांची चोरी झाली. या प्रकरणी ठाणे मालमत्ता गुन्हे शोध कक्षाने इसरार कुरेशी (वय ३३ वर्षे), शमशाद खान (वय ३३ वर्षे) आणि अनुज गिरी (वय ३० वर्षे) या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून १२ कोटी रुपयांपैकी ५ कोटी ८० लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. यांतील मुख्य आरोपी हा अधिकोषातील कर्मचारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (अशांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक) उर्वरित रक्कम त्याच्याकडे असू शकते, असा अंदाज पोलिसांना आहे. जप्त केलेली ५ कोटी ८० लाख रुपयांची रक्कम ही एका टेंपोमध्ये मुंब्रा येथे सुमारे दीड आठवडा पडून होती. अशी माहिती पोलीस अन्वेषणात समोर आली आहे. या प्रकरणात ३४ कोटी रुपयांची चोरी झाली होती; परंतु आरोपी त्यातील १२ कोटी २० लाख रुपये घेऊन गेला होता, तर उर्वरित रक्कम अधिकोषाच्या आवारात आढळून आली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील अन्वेषण चालू आहे.

संपादकीय भूमिका

अधिकोषातील चोरी करणार्‍यांना कठोर शासन केल्यासच अशा प्रकारांना आळा बसेल !