एप्रिलमध्ये निर्यातीत २४ टक्क्यांची वाढ !

एप्रिल २०२२ मध्ये निर्यातीमध्ये गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत २४ टक्क्यांची वाढ झाली असून ३८.१९ अब्ज डॉलर्सचा (२ लाख ९१ सहस्र कोटी रुपयांहून अधिकचा) व्यापारी माल भारतातून निर्यात झाला.

ट्विटरवरील व्यावसायिक आणि सरकारी खात्यांवर दर आकारण्याचे सूतोवाच !

जर ट्विटरने अशा प्रकारे पैसे आकारण्यास आरंभ केला, तर असे करणाऱ्या मोठ्या सामाजिक माध्यमांमध्ये ट्विटर पहिलेच माध्यम असेल. मस्क यांनी ट्विटरला विकत घेतल्यानंतर धोरणांमध्ये बरेच पालट होणार असल्याचे सांगितले जात आहे.

ब्रिटनच्या संसदेत अश्लील चित्रपट पहाणाऱ्या खासदाराचे त्यागपत्र

त्यागपत्र दिल्यावर ते म्हणाले की, हा माझा वेडेपणा होता आणि मी जे केले, त्याचा मला गर्व नाही. मी मनापासून क्षमा मागतो.

पुण्यातील पुण्येश्वर मंदिरातच महाआरती करण्यावर मनसे ठाम !

मंदिराला लागून छोटा शेख सल्ला मशीद आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला; मात्र पुणे पोलिसांनी अद्याप अनुमती दिली नाही.

राणा दांपत्याला जामीन संमत !

काही दिवसांपूर्वी राणा दांपत्याने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी ते दोघे अमरावती येथून मुंबईत आले होते.

पनवेल येथे सकाळी मशिदींमधून बांग देण्यात आली नाही !

मनसेचे शहराध्यक्ष योगेश चिले यांनी एका व्हिडिओद्वारे सकाळी मशिदींमधून बांग देण्यात आली नसल्याचे म्हटले आहे. प्रतिदिन पनवेलमध्ये पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी आणि ६ वाजून ८ मिनिटांनी अजान भोंग्यावरून दिली जायची

देयकासाठी ५० लाखांची लाच घेणाऱ्या जलसंधारण विभागातील ३ अधिकाऱ्यांना अटक !

प्रतिमास ५० सहस्र ते लाखो रुपयांचे वेतन आणि शासकीय सुविधा असतांनाही असे अधिकारी लाच घेत असतील, तर अशा अधिकाऱ्यांना बडतर्फच करायला हवे. तसेच त्यांनी अवैध मार्गाने कमावलेली संपत्ती जप्त करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी !

रत्नागिरीतील मशिदींत आता सकाळची अजान भोंग्यांविना होणार !

कुणीतरी आंदोलन करणार म्हटल्यानंतर नव्हे, तर अशी भूमिका मुसलमानांनी अगोदरच घेणे जनतेला अपेक्षित आहे !

अग्नीशमन यंत्रणा सुरळीत चालू असल्याचा अहवाल आता ‘ऑनलाईन’ !

मुंबईत आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी प्रत्येकी सहा मासांनी अग्नीशमन लेखा परीक्षण अहवाल (फायर ऑडिट रिपोर्ट) ‘ऑफलाईन’ सादर करावा लागत होता.

मुंबईत १ मासात १ सहस्र १४४ मशिदींकडून भोंग्यांसाठी अर्ज !

एप्रिल २०२२ मध्ये मुंबईतील १ सहस्र १४४ मशिदींकडून भोंग्यांसाठी पोलिसांकडे अर्ज करण्यात आला. त्यांतील ८०३ मशिदींना भोंगा लावण्यासाठी अनुमती देण्यात आली. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आश्वासन या मशिदींकडून देण्यात आले आहे.