वॉशिंग्टन (अमेरिका) – ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांनी ट्विटरवरील व्यावसायिक आणि सरकारी खाती यांसाठी दिल्या जाणाऱ्या सेवेवर दर आकारण्याचे सूतोवाच केला आहे. दुसरीकडे सर्वसाधारण नागरिकांसाठी मात्र ट्विटर हे विनामूल्यच असेल, असेही मस्क यांनी ट्वीट करून सांगितले.
Twitter will always be free for casual users, but maybe a slight cost for commercial/government users
— Elon Musk (@elonmusk) May 3, 2022
जर ट्विटरने अशा प्रकारे पैसे आकारण्यास आरंभ केला, तर असे करणाऱ्या मोठ्या सामाजिक माध्यमांमध्ये ट्विटर पहिलेच माध्यम असेल. मस्क यांनी ट्विटरला विकत घेतल्यानंतर आस्थापनेच्या धोरणांमध्ये बरेच पालट होणार असल्याचे सांगितले जात आहे.