रत्नागिरीतील मुसलमानांची पोलिसांच्या बैठकीतील भूमिका
रत्नागिरी – शहरातील मशिदींतून होणाऱ्या अजानविषयी येथील मुसलमानांनी, ‘प्रतिदिन सकाळची अजान भोंग्यांविना देण्यात येणार असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या भोंग्यांविषयीच्या आदेशाचे तंतोतंत पालन केले जाणार आहे’, अशी भूमिका पोलिसांसमोर घेतली. ४ मेपासून मशिदींवरील भोंग्यांविषयी भूमिका स्पष्ट करण्यासाठी शहरातील मुसलमान समाजातील पदाधिकाऱ्यांची बैठक येथील उपविभागीय पोलीस अधिकारी वाघमारे आणि शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी घेतली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. यासह ‘कोणताही अनुचित प्रकार घडला, तर कायदा हातात न घेता पोलिसांना त्याची कल्पना देऊ’, असेही मुसलमानांनी या बैठकीत स्पष्ट केले. मुसलमानांच्या या भूमिकेचे पोलिसांनी स्वागत केले आहे. (‘कायदा हातात घेतल्यास कारवाई करू’, अशी एरव्ही हिंदूंना दिली जाणारी चेतावणी पोलिसांनी या वेळी मुसलमानांना दिली का ? – संपादक)
संपादकीय भूमिकाकुणीतरी आंदोलन करणार म्हटल्यानंतर नव्हे, तर अशी भूमिका मुसलमानांनी अगोदरच घेणे जनतेला अपेक्षित आहे ! |