राज ठाकरे यांच्या व्यापक आंदोलनाचे पडसाद !
पनवेल – येथील मनसेचे शहराध्यक्ष योगेश चिले यांनी एका व्हिडिओद्वारे सकाळी मशिदींमधून बांग देण्यात आली नसल्याचे म्हटले आहे. प्रतिदिन पनवेलमध्ये पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी आणि ६ वाजून ८ मिनिटांनी अजान भोंग्यावरून दिली जायची; पण ४ मे या दिवशी अजान भोंग्यावरून न होता तोंडाने बोलून झाली, असे त्यांनी म्हटले. ‘यापुढेही अशीच अजान भोंग्यांवरून न देता तोंडी द्यावी’, असे चिले यांनी म्हटले आहे.